जालना : जालना शहर महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची निवड शुक्रवार(6)रोजी होणार आहे. त्यासाठी भाजपकडून भरण्यात आलेल्या दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
जालना महापालिकेत निवडून द्यावयाच्या सहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी 2 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यात काँग्रेसच्यावतीने विनोद विठ्ठलराव रत्नपारखे, शिवसेनेच्यावतीने अश्विन भास्कर आंबेकर, भाजपाच्यावतीने सिध्दिविनायक वसंतराव मुळे, अर्जुन कबुलमल गेही, आनंद शिवप्पा झारकंडे, श्रीमती नारियलवाले शोभा गोपाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
बुधवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत भाजपाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आनंद शिवप्पा झारकंडे, श्रीमती नारियलवाले शोभा गोपाल यांचे उमेदवारी अर्ज महापालिकेच्या आयुक्तांनी अपात्र ठरविले आहेत.
अपात्र ठरविण्यात आलेल्या स्वीकृत सदस्यांसाठी आता पुन्हा निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वीकृत सदस्यांचे अर्ज अपात्र ठरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.