Crime News pudhari photo
जालना

Jalna Crime : जालन्यात ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशीच तरुणाचा निर्घृण खून

जुन्या जालन्यात दर्गा रोडवरील घटना; रुग्णालयात मयताच्या नातेवाईकाची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहरातील जुना जालना भागातील दर्गा रोड परिसरात शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास लोधी मोहल्ला भागात राहणाऱ्या व जीम ट्रेनर असलेल्‍या एका तीस वर्षीय तरुणाचा दुचाकीवरुन आलेल्या दोन तरूणांनी चाकुचे वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल राजपूत (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्‍ही संशयीतांना ताब्यात घेतले आहे.

शहरातील दर्गा रोडवर सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना राहुल हा पाठीत धारदार चाकू खुपसलेल्या गंभीर जखमी अवस्थेत निदर्शनास आला. नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासासाठी दाखल केले होते.रुग्णालयात हलवितांनाच गंभीर अवस्थेत असलेल्या राहुल राजपूत यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या खुनाची बातमी शहरात पसरताच लोधी मोहल्ला भागातील नागरिकांसह मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

जालना शहरात अलीकडच्या काळात सतत घडणाऱ्या खुनासह गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरीकांसह व्यापारी व उद्योजकात प्रचंड असुरक्षीततेचे वातावरण झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोन आरोपींमध्ये एक अल्पवयीन असून दुसऱ्या आरोपीचे नाव श्रेयस पवार आहे.

दोन्हीही आरोपी जालना शहरातील विद्युत कॉलनीतील रहिवासी आहेत. राहुल राजपुत यास जिम मधुन प्रोटीन पावडर आणण्यासाठी पाच हजार रुपये देऊनही त्‍याने ती दिली नसल्यामुळे ही हत्या झाल्याची माहिती प्राथमीक तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT