Krishna Marathwada Lift Irrigation Scheme : ३२ कोटींच्या निविदा अनियमिततेबाबत अहवाल मागविला

पाटबंधारेच्या कार्यकारी संचालकांची माहिती : ‘कृष्णा मराठवाडा सिंचन’ योजने मर्जीतील कंत्राटदाराला लाभ दिल्याचा प्रकार
Krishna Marathwada Lift Irrigation Scheme
Krishna Marathwada Lift Irrigation Schemepudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील ‘कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र. २ च्या ३२ कोटींच्या कामाच्या निविदेत अनियमितता झाल्याचा प्रकार ‘दै. पुढारी’ने समोर आणला. या प्रकरणात संबंधित विभागाकडून अहवाल मागविण्यात आला असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी यांनी दिली.

सुमारे ३२ कोटी अंदाजपत्रकीय दर असलेली ही निविदा गोदावरील मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या धाराशिव येथील कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग १ ने १३ मे २०२६ रोजी प्रकाशित केली होती. या ३२ कोटी रुपयांतून कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील रामदरा साठवण तलावासाठी सांडवा व कालव्याचे बांधकाम करायचे आहे. या कामासाठी ६ कंत्रादारांनी निविदा भरली. मात्र तांत्रिक तपासणीत त्यातील तब्बल पाच कंत्राटदार अपात्र ठरविण्यात आले. ‘वाटाघाटी’ अंती हे काम मे. जय साई अदित्य काॅर्पोरेशन या ठेकेदाराला देण्यात आले.

Krishna Marathwada Lift Irrigation Scheme
Mumbai Airport Gold Smuggling: दूध पावडर, ओट्सच्या पाकिटांत लपवले १४.८१ कोटींचे सोने; मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

नियमानुसार पहिल्यांना निविदा काढल्यानंतर जर तीनपेक्षा कमी कंत्राटदार पात्र ठरत असतील तर निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढाव्यात असा शासनाचा १८ ऑक्टोबर २०२३ जीआर आहे; परंतु त्यातही पळवाट आहे. एकच निविदा पात्र ठरत असेल तर आणि ठेकेदाराने दिलेला दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी किंवा तितकाच असेल तर ती स्वीकृत करावे, असाही नियम आहे.

या प्रकरणात मे. जय साई अदित्य काॅर्पोरेशनने दिलेला दर हा अंदाजपत्रकापेक्षा पाच टक्के अधिक होता. तरीही त्यांच्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांनी ‘वाटाघाटी’ केल्या आणि मग तो ठेकेदार अंदाजपत्रकारपेक्षा १ टक्के कमी दराने काम करण्यात तयार झाला. त्यानंतर त्याला वर्क ऑर्डर देण्यात आली.

या ‘वाटाघाटी’साठी अधिकाऱ्यांनी शासनाच्या आणखी एका पळवाटेचा आधार घेतला. अंदाजपत्रकारपेक्षा जास्त दराची निविदा असेल तर सक्षम स्तरावर मंजुरी घेऊन अशा निविदा स्वीकृत कराव्यात असाही नियम आहे; परंतु या नियमाचा अधार घेताना संबधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांची मंजुरी घेतल्याचे सांगितले. वास्तविक पाहता सक्षम स्तरावर म्हणजे महामंडळाच्या कार्यकारी संचालकाच्या स्तरावरून त्यांनी मान्यता घेते आवश्यक होते, असे तक्रारदार नितीन पाटील खोडेगावकर यांचा आरोप आहे.

Krishna Marathwada Lift Irrigation Scheme
Ahilyanagar 33 Roads Development: अहिल्यानगरमध्ये ३३ रस्त्यांचा विकास; ३०० कोटींचा प्रस्ताव

मे. जय साई अदित्य काॅर्पोरेशनलाच काम मिळावे, यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी शासनाचे अनेक नियम पायदळी तुडविले, त्यामुळे ही निविदा रद्द करून पुन्हा नव्याने ती प्रकाशित करावे, तसेच संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खोडेगावकर यांनी पाटबंधारे विभागाने कार्यकारी संचालक जयंत गवळी यांच्याकडे तक्रारीद्वारे केली होती. या अनियमिता आणि तक्रारीबाबत कार्यकारी संचालक गवळी यांना ‘दै. पुढारी’ प्रतिनिधीने प्रतिक्रिया विचारली असता, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे अहवाल मागविला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कागदपत्रेही अपुरी

निविदेसोबत मे. जय साई आदित्य काॅर्पोरेशन या ठेकेदाराने अटीशर्तीनुसार कागदपत्रही जोडलेली नसल्याचेही समोर आले आहे. त्यांना .निविदा भरताना आपल्या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी व कर्मचाऱ्यांच्या वेतन पत्रकाचे क्लिअरन्स प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक होते. ते जोडलेले नसतनाही ही निविदा पात्र ठरलीच कशी? असाही सवाल तक्रारदार नितीन खोडेगावकर यांनी उपस्थित करीत ही निविदा तातडीने रद्द करावी, अन्यथा या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news