जालनाः तालुक्यातील रेवगाव येथील याच शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नाही.  pudhari photo
जालना

Jalna agriculture news : 'महाबीज'च्या मोफत बियाणांचा फज्जा?

४० शेतकरी फसले, 'फुले दुर्वा' वाणाच्या लॉट क्रमांक ४४४ वर संशय; नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जालना : प्रामुख्याने जिरायती पिकांवर अवलंबून असलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकरी आता शेती पद्धतीत बदल करत नावीन्यपूर्ण पिकांकडे वळताना दिसत आहेत. पारंपरिक पिकांसोबतच मोसंबीच्या उत्पादनातून अतिरिक्त उत्पन्न मिळवणारे शेतकरी आता कंदवर्गीय रानभाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफेद मुसळीच्या लागवडीकडे वळले आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा जालनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १४० शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करून नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आत्मा नियामक मंडळाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल आणि आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांच्या मार्गदर्शनाखाली या पिकाचे प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक आणि बाजारपेठाभिमुख शेती पद्धतीची माहिती मिळत असून, पीक पद्धतीत सकारात्मक बदल होत आहेत.

सफेद मुसळी हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध आणि बाजारात चांगली मागणी असलेले पीक आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे हे पीक असल्याने पाण्याचा तुलनेने कमी वापर होतो, तसेच उत्पादन खर्च नियंत्रित राहतो.

याशिवाय, या उपक्रमामुळे पुढील वर्षासाठी लागवडीसाठी आवश्यक बियाणे जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरील बाजारावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि उत्पादन खर्चात बचत होईल. स्थानिक पातळीवर बियाणे उपलब्ध झाल्यामुळे लागवड क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. सफेद मुसळीच्या लागवडीमुळे शेतीत विविधता येत असून, जोखीम कमी करण्यास मदत होत आहे.

हवामानातील बदलांचा परिणाम कमी करण्यासाठीही हे पीक उपयुक्त ठरत आहे. तसेच औषधी वनस्पतींच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना स्थिर आणि चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, जालना जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीतून बाहेर पडून नावीन्यपूर्ण पिकांकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.

बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.
रवी राठोड , गुण नियंत्रण अधिकारी, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT