Jalna Crime News : Youth carrying dagger in police custody
जालना, पुढारी वृत्तसेवा कदीम जालना पोलिसांनी धारदार खंजर बाळगून फिरणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.११ जून) दुपारी ४.२० वाजता पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नूतन वसाहत उड्डाणपुलाखाली, जुना जालना परिसरात आदील कलीम शेख, रा. हनुमान मंदिराच्याजवळ, इंदिरानगर, हातात धारदार शस्त्र घेऊन संशयास्पदरीत्या फिरत आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संबंधित व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून १,२०० रुपये किमतीचा सुमारे ३१ सेंमी लांबीचा धारदार खंजर जप्त करण्यात आला. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.