Crime News : लूटमार, चाकूहल्ला करणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

जिन्सी व जवाहरनगर हद्दीतील दोन गुन्हे उघड
Crime News
Crime News : लूटमार, चाकूहल्ला करणारा अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यातFile Photo
Published on
Updated on

Juvenile involved in robbery and knife attack taken into custody by the Crime Branch

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका अल्पवयीनने (विधी संघर्षग्रस्त बालक) चाकूचा धाक दाखवून चक्क रिक्षा पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यासोबतच याच अल्पवयीन मुलाने जिन्सी भागात एका तरुणावर चाकूहल्ला केल्याचेही तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या अल्पवयीनला शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून पळवलेली रिक्षा आणि चाकू जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी बुधवारी (दि.१३) दिली.

Crime News
Sambhajinagar Street Crime : स्ट्रीट क्राईमचा भडका

गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, जवाहरनगरमधून पळवलेली रिक्षा एका अल्पवयीन मुलाकडे आहे. उपनिरीक्षक संदीप काळे यांच्या पथकाने सापळा रचून दुपारी ३:५० वाजता चंपा चौक परिसरातून या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने रिक्षा पळवल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून रिक्षा जप्त केली. रिक्षात लपवून ठेवलेला एक धारदार चाकूही हस्तगत केला. ही कारवाई प्रभारी पोलिस आयुक्त पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक संदीप काळे, अंमलदार कैलास काकड, संदीप तायडे, संतोष पारधे, बाळू नागरे, विजय निकम, मनोज विखणकर यांनी केली.

Crime News
Beed Crime : चकवा देणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी दाखवला चमत्कार!

चाकूचा धाक दाखवून रिक्षा पळवली

फिर्यादी गोविंद सूर्यकांत काजळे (३०, रा. मुकुंदवाडी) यांची रिक्षा (एमएच-२०-इके-१६०७) ही सोमवारी (दि.११) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जवाहरनगर हद्दीतून पळवून नेण्यात आली होती. मोंढा नाका उड्ड ाणपुलावर आरोपीने त्यांना भररस्त्यात चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने ही रिक्षा हिसकावली होती. या प्रकरणी काजळे यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिन्सीतही केला होता चाकूहल्ला

रिक्षा पळवण्याच्या घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी (दि. १०) रात्री ११ वाजेच्या सुमारास याच अल्पवयीनने कैसर कॉलनी, मिनार मस्जिद-जवळ सुलतान मुनीर खान या तरुणावर चाकूहल्ला करून त्याला जखमी केले होते. याप्रकरणी यास्मीन मुनीर खान (वय ३५) यांच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news