Jalna city and district prepare for Navratri festival
जालना पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात विविध नवरात्र उत्सव मंडळांकडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी घटस्थापनेने नवर-ात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. उत्सव काळात मंडळांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. गणेश-ोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवातही पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताचा ताण पडणार आहे. नवरात्रोत्सवानिमीत्त शहारातील विविध भागात घटस्थापनेसाठी पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. मंदीरासह सार्वजनीक नवरात्रोत्सव मंडळानी केलेल्या विद्युत रोषणाईने परिसर उजळुन निघाला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून महिलावर्गातून नवरात्रोत्सवाची विशेष तयारी सुरु आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी शहरात दिवसभर महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. सोमवारपासुन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवाची घरा-घरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.
घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली. शहरासह जिल्हाभरात नवरात्र उत्सव मंडळांकडूनही मोठ्या प्रमाणावर उत्सवाची तयारी केली गेली आहे. जिल्हाभरात विविध गावांमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त घटनस्थापना करुन देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त लावला जाणार आहे. नवरात्रोत्सवासाठी पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
डिजिटल लायटिंग ठरणार आकर्षण
मत्सोदरी देवी मंदीर परिसरात सीसीटीव्हीव्दारे दोन पोलिस लक्ष ठेवणार आहे. पोलिसांचा मंदीर परिसरात चोख बंदोबस्त राहणार आहे. आजारी व वृध्द भाविकांसाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी मंदिरावर करण्यात आलेली डिजिटल लाईटींग भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील देवीच्या मंदीरात नऊ दिवस विविध धार्मीक कार्यक्रम होणार आहे.