

Navratri festival begins at Ajubai Devi temple in Anwa
सादिक शेख
आन्वाः भोकरदन तालक्यातील आन्वा येथील आजुबाई देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होत असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाची मंदीर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली असून आजुबाई देवीची शक्तिपीठे भक्तांच्या गर्दीने फुलणार आहेत.
आन्वा परिसरात आजुबाई देवी मंदीरासह घरा-घरात सूयोदय ते सूर्यास्तापर्यंत घटस्थापनेचा मुहर्त पाहुन 'देवीचे घरोघरी नऊ दिवस विराजमान झाल्याने सर्वत्र भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजुबाई देवी मंदिरात नवरात्रौत्सवात दररोज पहाटे साडेसहा वाजता आजुबाई मातेची महापूजा सकाळी ८ ते १० आणि दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत दुर्गा सप्तशती पाठ वाचन होणार आहे.