Jalna-Chhapra-Jalna special train to run two days a week
जालना, पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या जालना-छपरा-जालना विशेष गाडीच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६५१/०७६५२ या विशेष गाडीच्या ऑक्टोबर महिन्यात एकूण आठ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०७६५१ जालना-छपरा विशेष गाडी ऑक्टोबर मध्ये प्रत्येक बुधवारी, म्हणजेच ७, १४, २१ आणि २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३५ वाजता जालना स्थानकातून सुटणार आहे. ही गाडी शुक्रवारी सकाळी ९.३५ वाजता छपरा येथे पोहोचणार आहे. या दिशेने एकूण चार फेऱ्या होतील. तर गाडी क्रमांक ०७६५२ छपरा-जालना विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी, म्हणजेच ९, १६, २३ आणि ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता छपरा येथून सुटणार असून रविवारी सकाळी ९.५९ वाजता जालना येथे पोहोचणार आहे. या दिशेनेही चार फेऱ्या होणार आहेत. या विशेष गाडीमध्ये 2 एसी, 3 एसी, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असतील.
अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा
जालना-छपरा आणि छपरा-जालना या दोन्ही दिशेने ही विशेष गाडी छत्रपती संभाजीनगर, नगरसूल, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज, वाराणसी, जौनपूर जंक्शन, औंरीहार, गाझीपूर सिटी आणि बलिया या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.
आठ फेऱ्या होणार
फेऱ्या : दोन्ही दिशेने प्रत्येकी 4; एकूण 8 फेऱ्या कालावधी : ऑक्टोबर 2026 डबे : 2 एसी, 3 एसी, शयनयान व सामान्य द्वितीय श्रेणी