Water Scarcity : ऑक्टोबरमध्येच तलाव कोरडे ! ६० पैकी ४२ लघु प्रकल्प तळाशी; ३ मध्यम प्रकल्प ज्योत्याखाली

जालन्यात पाणीटंचाईचे तीव्र संकट, ' मध्यम व लघु प्रकल्पांत केवळ १० ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक
Water Scarcity
Water Scarcity : ऑक्टोबरमध्येच तलाव कोरडे ! ६० पैकी ४२ लघु प्रकल्प तळाशी; ३ मध्यम प्रकल्प ज्योत्याखालीfile photo
Published on: 
Updated on: 

Water Scarcity: Lakes dry up as early as October

जालना, पुढारी वृत्तसेवाः यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच जालना जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील उपयुक्त जलसाठा अत्यंत खालावला आहे. अनेक प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा उरला नाही. ४२ लघु प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. यामुळे ख्बी हंगामासह आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Water Scarcity
Knife attack : तडीपार गुंडाचा फुकट पाणीपुरी खाऊन विक्रेत्यावर चाकूहल्ला

जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ६५.७९ द.ल.घ.मी. असताना सध्या केवळ १०.३० द.ल.घ.मी. (१५.६६ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. भोकरदन तालुक्यातील धामणा, जाफराबाद तालुक्यातील जिवरेखा आणि अंबडचा गल्हाटी हे तीन मध्यम प्रकल्प पूर्णपणे तळाच्या पातळीवर पोहोचले आहेत.

भोकरदनच्या जुई मध्यम प्रकल्पात केवळ १.८९ टक्के आणि बदनापूरच्या अप्पर दुधना प्रकल्पात केवळ १२.०७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. कल्याण गिरजा (४१.९८ टक्के) आणि कल्याण मध्यम (३८.२२ टक्के) या दोन प्रकल्पांतच जेमतेम ३५ ते ४० टक्के पाणी आहे. लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या ६० प्रकल्पांची स्थिती अधिकच भयावह आहे.

Water Scarcity
Fraud Case : शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; पर्यावरण सल्लागाराला १५ लाखांचा गंडा

जिल्ह्यातील ६० पैकी तब्बल ४२ लघु प्रकल्प 'जोपाखा' (तळाशी/मृत साठा) स्थितीत गेले आहेत. ८ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध आहे. ५ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. अवघ्या ३ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असून, जिल्ह्यातील एकही प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला नाही. लघु प्रकल्पांची एकूण क्षमता १८१.३७द.ल.घ.मी. असताना प्रत्यक्ष उपयुक्त साठा अवधा १७.४७ द.ल.घ.मी. (१० टक्क्यांपेक्षा कमी) उरला आहे.

रब्बी हंगाम धोक्यात; शेतकऱ्यांची चिंता वाढली

पावसाने दिलेल्या ओढीमुळे बंधारे आणि तलावांमध्ये पुरेसा साठा जमा झालेला नाही. कोल्हापूर पद्धतीचे बहुतांश बंधारेही कोरडे पडले आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती असल्याने येत्या काही महिन्यांतच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात असून, शेतीसाठी पाणी मिळणे कठीण झाल्याने रब्बी हंगामावर मोठे संकट ओढवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news