जालनाः ऊसतोड कामगारांसोबत पालावर दिवाळी साजरी केली. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह इतर पदाधिकारी. pudhari photo
जालना

Jalna BJP Diwali Celebration : भाजपाची ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी

कष्टकऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे, हीच दिवाळीची गोडी : भास्कर दानवे

पुढारी वृत्तसेवा

जालना : भारतीय जनता पार्टी जालना महानगरच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार, (दि.७) रोजी बठाण बु. ता. जालना येथे ऊसतोड कामगारांसोबत पालावरची दिवाळी हा उपक्रम राबविण्यात आला. परिसरातील कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भेटवस्तू तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या गृहउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी उपस्थित कामगारांशी संवाद साधला. समाजातील कष्टकरी आणि श्रमिक घटक हा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

यावेळी भास्कर दानवे म्हणाले, की कष्टावर अनेकांचे जीवनमान अवलंबून आहे. या प्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश केळकर गटनेते महेश निकम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद भताने, सरपंच ज्ञानेश्वर देवडे, दत्तू नाना बागल, नानासाहेब देवडे, बळीराम शिंदे, जिल्हा सरचिटणीस वसंत शिंदे, सुनील पवार, शिवप्रकाश चितळकर, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, उद्धव ढवळे, विष्णू ढगे, सागर वाहूळकर, रामनाथ देवडे, नवनाथ सिरसाठ, भाऊसाहेब गोल्डे, रवी जगधने, बाबुराव बागल, सुभाष बागल यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभरात पालावरची दिवाळी...

दिवाळी हा आनंद, आपुलकी आणि माणुसकी जपण्याचा सण आहे. कुटुंबापासून दूर राहून कष्ट करणाऱ्या या कामगारांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेता यावा, त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात पालावरची दिवाळी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात व गरजूंच्या मदतीसाठी तत्पर राहणे हेच आपल्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT