Jalna Bike thief arrested, two bikes seized
जालना, पुढारी वृत्तसेवा : दुचाकी चोरणाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई बुधवार दि. ७ रोजी चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरनगर येथे करण्यात आली.
दरम्यान, जालना जिल्हयात मोटार सायकल चोरी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक अजय कुमार बसंल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी एक पथक तयार केले. मोटार सायकल चोरी करणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळवित असतांना सलीम खान रशिद खान, ३२, रा. सुंदरनगर, चंदनझिरा, जालना याचेकडे चोरीच्या मोटारसायकल असल्याची माहिती गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. दोन मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे सांगून १ लाख १० हजार किमतीच्या दोन मोटारसायकल काढून दिल्या.
यांनी केली ही कारवाई
पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि, योगेश उबाळे, सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार संभाजी तनपुरे, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सतीश श्रीवास, रमेश काळे, किशोर पुंगळे, कैलास चेके, अशोक जाधवर आदींनी केली.