जालनाः नशेच्या गोळ्यासह संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यावेळी पोनि. पंकज जाधव यांच्यासह इतर पथक. pudhari photo
जालना

Jalna crime : 'बटन गोळ्या' विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; चार आरोपींना अटक

६६०० अल्प्राझोलम गोळ्यांचा १९ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त; एलसीबीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जालना : अल्प्राझोलम (Alprazolam) गुंगीकारक औषधी टॅबलेट अर्थात 'बटन गोळ्या' विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जालना स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ६६०० गोळ्या जप्त केल्या असून, त्यांची किंमत १९ हजार ८०० रुपये आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, दि. २७ रोजी लक्कडकोट परिसरात एक इसम अल्प्राझेप ०.५ या गोळ्यांचा बेकायदेशीर साठा घेऊन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून जफर अहमद खान मंजूर अहमद खान (वय ७५, रा. कारंजा रोड, कटकटपुरा, बीड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अल्प्राझेप ०.५ या औषधाच्या ६६०० गोळ्या असलेले ११ बॉक्स जप्त करण्यात आले.

या साखळीतील सय्यद युसुफ अली सय्यद अली (वय ४४, रा. रांजणी, ता. घनसावंगी), शिवप्रसाद संतोष बडदमकर (वय २२, रा. सुंदराईनगर, परभणी) आणि शेख अलीम शेख इस्माईल (वय २७, रा. अपना कॉर्नर, शालीमार, परभणी) यांचा सहभाग निष्पन्न झाला. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी

पोलिसांनी तिघांनाही परभणी शहरातून ताब्यात घेतले. चारही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT