Sambhajinagar illegal plotting : महापालिका पथकाची पुन्हा अवैध प्लॉटिंगवर कारवाई

पहाडसिंगपुरात १०० ते ११० एकरांवरील १३५० अनधिकृत प्लॉट भुईसपाट
Sambhajinagar illegal plotting
हनुमान टेकडी भागातील पहाडसिंगपुरा परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई करताना महापालिकेचे पथक.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अनधिकृत प्लॉटिंगचा विळखा आता सरकारी जमिनीपर्यंत पोहोचल्याचे शुक्रवारी ( दि.२८) पहाडसिंगपुरा भागातील कारवाईतून समोर आले. हनुमान टेकडीमागे तब्बल १०० ते ११० एकर परिसरात मनपाची कोणतीही परवानगी न घेता विकसित करण्यात आलेले तब्बल १३५० प्लॉट महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केले. या कारवाईमुळे अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी विशेष पथकाने पहाडसिंगपुरा येथे कारवाई केली. या परिसरातील विविध गट क्रमांकांमध्ये मोठ्या भूखंडांचे छोटे प्लॉट पाडून त्यांचा विकास करण्यात आला होता.

Sambhajinagar illegal plotting
CIDCO HUDCO water supply : सिडको-हडकोचा गॅप एक दिवसाने घटणार

यामध्ये गट क्र. ४० मधील रामनाथ किसन शेळके, ४०/१ मधील सोनू पटेल, ४२ मधील हाश्मी क्रिएटर्स, ४२/३ मधील नरूल हुसैन, ४५ मधील आत्माराम डोबळे, ४५/१ मधील सादात खान, ४९ मधील आसिफ शेख, २३३ मधील कल्पतरू शिक्षण संस्था आणि २३७ मधील सफर खान हुसैन यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती मनपाने दिली.

मनपाच्या अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. अनधिकृतपणे आखणी केलेले प्लॉट, रस्ते आणि इतर विकासकामे हटविण्यात आली. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर पथक आणि जेसीबी दाखल होताच कारवाईला विरोध करण्यासाठी नागरिकांसह संबंधितांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Sambhajinagar illegal plotting
Chhatrapati Sambhajinagar News : भूसंपादनाच्या दर निश्चितीनंतर ग्रीनफिल्ड वे साठी मोजणी करा

मात्र, प्रशासनाने कारवाई थांबविण्यास नकार देत संबंधितांकडे प्लॉटिंगची अधिकृत परवानगी तसेच जमिनीशी संबंधित कायदेशीर कागदपत्रांची मागणी केली. ही कारवाई महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली-शहरातील अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

कागदपत्रांची तपासणी करा

नागरिकांनी कोणताही प्लॉट खरेदी करण्यापूर्वी जमिनीची कागदपत्रे, जमीन वापराचा प्रकार तसेच संबंधित प्राधिकरणांच्या मंजुरी तपासाव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news