जालना ः गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडल्यानंतर ट्रकसह पोलिस अधिकारी.  pudhari photo
जालना

Jalna gutkha seizure : ट्रकमधून जाणारा 21 लाखांचा गुटखा जप्त

चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा, ट्रकचालकास केले जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील आय.टी.आय. कॉलेजच्या समोरुन जाणाऱ्या आयशर ट्रक (क्रमांक एमएच07 पी-2837)मधून जाणारा 21 लाख 60 हजाराचा गुटखा सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रीमती जान्हवी शेखर यांनी त्यांच्या पथकासह पकडला.या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलीस अधीक्षक जालना श्रीमती जान्हवी शेखर यांना शहरात ट्रकमधुन विक्रीसाठी गुटखा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चंदनझिरा पोलिसांसह जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर संशयित आयशर ट्रक थांबविला.सदर ट्रकची पाहणी केली असता ट्रकमधे 21 लाख 60 हजारांचा गुटखा व ट्रक असा 31 लाख 60 हजार रुपयाचा ंमुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलिस ठाणे चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आयशर ट्रकमध्ये राजनिवास पान मसाला, जाफरानी जर्दा या कंपनीचा 21 लाख 60 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा व वाहतुक करणे करीता वापरण्यात आलेला 10 लाख रुपये किंमतीचा आवशर ट्रक जप्त केला करण्यात आला.

जप्त केलेल्या मालाबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्याने पोलिस ठाणे चंदनझिरा जालना येथे आंयशर ट्रक चालक शकील आमीन पठाण (रा. चंदनझिरा) याच्याविरुध्द तक्रार नोंदविण्यात आली.

यांची कारवाई

सदर कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल , अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक श्रीमती जान्हवी शेखर, अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोउपनि निता दामधर, पोहेकॉ प्रशांत देशमुख, पोकॉ नवनाथ पाटील, पोहेकॉ राजेश काळे, शुभम तळेकर, जकी पठाण, शोभा राठोड यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT