Impact of Jarangan movement on Pola Festival
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : बदनापूर तालुक्यात पोळा सणावर अनेक गावात मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या २९ ऑगस्ट रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा प्रभाव दिसून आला. अनेक ठिकाणी मनोज जरांगे यांची प्रतिमा व २९ ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा संदेश पहावयास मिळाला.
बदनापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्जा-राजाच्या पाठीवर झुल, शिंगांना रंग देऊन व फुगे बांधून त्यांना सजविण्यात आले होते. सर्जा-राजांसाठी घरा-घरात पुरण पोळीचा नैवेद्य तयार केल्याचे दिसुन आले.
सकाळपासून बैलांना सजविण्यासाठी शेतकरी कामाला लागले होते. पोळा सणामुळे शेतात शुकशुकाट दिसून आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. नारायण कुचे यांनी तालुक्यातील मानदेऊळगाव येथील त्यांच्या शेतात बैलांची सपत्नीक पूजा केली. यावेळी देविदास कुचे तसेच अंबड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संगीता कुचे यांचीही उपस्थिती होती.