

Mosambi fruit drop due to fungus
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा या वर्षीही मोसंबी बागातदाराला सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीच्या मुळे फटका बसला आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे मोसंबीला बुरशी लागून मोसंबीच्या फळांचा झाडाखाली पडून खच झाला झालेले आहे. यात जवळपास चाळीस ते पन्नास टक्के माल गळून पडलेला आहे. यामुळे फळबागायतदार शेतकरी चिंतेत आहे.
मराठवाड्यातील जिल्हा हा मोसंबीफळ भागासाठी प्रसिद्ध आहे. त्यातच जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीच्या फळबागा आहे. परंतु यंदा मोसंबी बागायतदार फळगळतीने संकटात सापडलेला आहे. जवळपास ४० ते ५० टक्के माल हा खाली गळून पडलेला आहे. काही भागांत अक्षरशः मोसंबी बागा खाली झालेल्या आहे. सध्या मोसंबीला आंब्या बहारचा माल आहे. ह्या बहरचा माल जवळपास शेतकरी दिवाळीपर्यंत ठेवतात. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की मोसंबी तोडणीला येण्याअगोदरच पिवळी पडून खाली पडत आहे. मार्केटलाही सध्या शेतकऱ्यांना हवा तसा भाव मिळत नाही. मोसंबी ही मार्केटला कवडीमोल भावाने विकल्या जात आहे. मोसंबी बागावर लावलेला खर्चदेखील वसूल होणार नाही असे चित्र सध्या दिसून येत आहे.
मोसंबीच्या मिरग्या बहारावर मुंगू रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोसंबी अक्षरशः बांधावर तोडून फेकावी लागली होती. शेतकऱ्यांच्या मागे नेहमीच संकटाची मालिका सुरू असते कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी होतं नव्हतं ते सर्व खर्च बागेवर केले.