जालनाः वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  pudhari photo
जालना

Jafrabad Crime : पत्र्याच्या शेडमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांनी केली पीडितेची सुटका

जाफराबाद शहरातील जिल्‍हा परिषद शाळेच्‍या बाजूला सुरू होता अड्डा

पुढारी वृत्तसेवा

जालना: जाफराबाद शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार, दि. १७ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष जालना आणि जाफ्राबाद पोलिसांनी संयुक्तपणे करण्यात आली.

वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या ५० वर्षीय महिला मालकासह एका २५ वर्षीय ग्राहकाला रंगेहाथ पकडण्यात आले असून, एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. छाप्‍यात ५० वर्षीय महिला ( रा. जाफराबाद) व ऋषीकेश राजू तेलंग्रे (२५ वर्ष, रा. वालसा, ता. भोकरदन. या ग्राहकास ताब्‍यात घेण्यात आले.

आरोपींच्या ताब्यातून ७,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्यात फिर्यादीवरून जाफ्राबाद पोलिस ठाण्यात महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमाच्‍या विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT