Bhokardan Crime : लोखंडी सळ्या चोरणारे चोरटे जेरबंद

पिकअपसह 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Bhokardan Crime News
भोकरदन ः तालुक्यातील हसनाबाद पोलिसांनी चोरीच्या सळ्या घेऊन जाणारा पिकअप सळ्यासह पकडला. (छाया ः रवींद्र देशपांडे)
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील हसनाबाद पोलिसांनी 30 मे रोजी रात्री गस्तीवर असताना धाड जिल्हा बुलढाणा येथून लोखंडी सळ्या चोरुन त्या पिकअप वाहनात घेउन जात असताना सदर पिकपसह एका व्यक्तीला पकडले.आरोपीच्या ताब्यातुन लोखंडी सळ्या व पिकप गाडी असा अकरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हसनाबाद पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी भरत कुमार चौधरी, नारायण चरावंडे, दिपक सोनुने, प्रकाश बोर्डे हे 30 मे च्या रात्रीपासुन 31 मे च्या सकाळपर्यंत हसनाबाद व जानेफळ बिट हद्दीत नाईट गस्त घालत असतांना सकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांना हसनाबाद फाटा येथुन एक महिंद्रा कंपनीचा पिकअप सुसाट वेगाने येतांना दिसला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संशयीत पिकअप हसनाबाद फाटा येथे थांबविला.

Bhokardan Crime News
DG Insignia Award: पोलिस आयुक्तालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

यावेळी पिकअप चालकाला वाहनाबाबत विचारणा केली असता त्यांने सदर महिंद्रा पिकअप हा स्वतः हाच्या मालकीचा असल्याबाबत सांगीतले.मात्र वाहनांचे कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली तसेच त्यास पिकअप मधील लोखंडी सळयाबाबत विचारपुस केली. यामुळे पोलिसांना संशय आला. याबाबत पोलिसांनी सपोनि योगेश उबाळे यांना माहीती दिली. त्यानंतर महिंद्रा पिकअप चालकाला लोखंडी सळयाच्या बिलाबाबत विचारणा केली असता त्याला ती कागदपत्रे दाखवीता आली नाही.

लोखंडी सळ्या चोरुन आणल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी पिकअप चालकास विश्वासात घेवुन विचारणा केली असता पिकअप चालकाने त्याचे नांव विजय बाबुराव पाखरे ( रा. अंबड, साठेनगर जि. जालना) सांगीतले .यावेळी पोलिसांनी 7 लाख 50 हजाराचा पिकअप व सळया असा साडेतीन लाखांच्या सळया असा अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली.या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रकाश बोर्डे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhokardan Crime News
Beed crime news | सिनेस्टाईलने पाठलाग करून अवैधरित्या दारू वाहतूक करीत असलेली कार पकडली; केज पोलिसांची कारवाई

सदरचा मुद्देमाल हा बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधु ,अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हसनाबाचे प्रभारी अधिकारी योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक सखाहरी तायडे, सहाय्यक फौजदार मंगलसिंग सोळंके, जमादार भरत कुमार चौधरी, दुर्गेश राठोड, पोलिस कर्मचारी दिपक सोनुने, प्रकाश बोर्ड , नारायण चरावंडे, शंकर क्षीरसागर, नितेश खरात, अनिल सवडे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news