Heavy rains waterenter fields cause damage raising height road waterenter fields
बदनापुर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील रामखेडा या शिवारातील कपाशीचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बदनापूर ते चिखली या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पूर्वी पावसाचे पाणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमधून जात होते.
परंतु आता तेथे असल्याने नाल्या बुजविण्यात आलेल्या आहेत. तसेच नवीन रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू रस्त्याची उंची जमिनीपेक्षा अधिक असल्याचे पावसाचे पाणी शेती मध्येच तुंबुन राहात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मोठे नुकसान होताना दिसून येत आहे.
रामखेडा शिवार व परिसरातील शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिके रस्त्याची उंची वाढविल्याने शेतात पाणी साचून पाण्याखाली जाऊन नष्ट झाली आहे. असतानाच पिकांचे नुकसान होत तालुक्यात काही भागात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होत असल्याचे पहावयास मिळत आहे.