Green flag hoisted at Mahavir Chowk, a wave of anger among Jain community members
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील महावीर चौकात हिरवा झेंडा लावण्यात आल्याने जैन समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे. महावीर चौक हा जैन समाजासाठी धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठिकाण असून, येथे भगवान महावीर स्वामी यांचे स्मृतीचिन्ह आहे.
यासंदर्भात जैन समाजाच्या वतीने प्रशासनास निवेदने सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि.७ सप्टेंबर रोजी महावीर चौक परिसरात हिरवा झेंडा लावलेला आढळून आला. हा प्रकार शहरातील शांतता, सुव्यवस्था व सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येते. ही कृती भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९९ व ३९८ अंतर्गत दंडनीय आहे. हिरवा झेंडा तत्काळ काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अक्षय गोरंट्याल यांनी भगवान महावीर यांच्या स्मारक सेवापुतळा चौकात चुकीची घटना घडली. झेंडा आम्ही काढून टाकला आहे. यापूर्वीच आम्ही सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार व अनेक निवेदनं दिली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पुरावे मिळतील आणि त्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.