soybean Pudhari
जालना

Soybean Prices: मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दराची अखेर उसळी, तीन वर्षांत प्रथमच पाच हजार पार, कारण काय?

सोयाबीनला आला उठाव : दरवाढीचा फायदा कोणाला?

पुढारी वृत्तसेवा

For the first time in three years, soybean prices have crossed the five thousand mark

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : तीन-साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दराने अखेर उसळी घेतली असून बाजारपेठेत सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार दो-नशे रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचले आहेत. तीन वर्षानंतर पहिल्यांदाच सोयाबीनने पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने बाजारपेठेत तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हमीभाव योजनेंतर्गत नाफेडकडून भोकरदन तालुक्यातील आन्वासह वाकडी, भिवपूर, दानापूर, पिंपळगाव रेणुकाई सोयाबीन खरेदी केंद्र सूरू आहे. येथे ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे, मात्र. खासगी बाजारात सोयाबीनच्या दराने उसळी घेतल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. नाफेड आणि खासगी व्यापाऱ्यांचे दर १०० ते २०० रुपयांचे दरम्यान कमी-अधिक आहे. त्यामुळे केंद्रापेक्षा खासगी बाजारात शेतकरी आपला माल आणत आहेत.

अशा परिस्थितीत डीओसीची मागणी वाढली, शिवाय सरकी देखील महागली. त्यामुळे सोयाबीनला उठाव आला अमेरिका, ब्राझील आणि अर्जेटिना या प्रमूख सोयाबीन उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदल, उत्पादन अंदाजात घट आणि निर्यातीवरील मर्यादा यामुळे जागतिक बाजारात दर वाढल्याचे बोलले जात आहे.

तीन वर्षापासून सोयाबीनचे दर ३८०० ते ४२०० भाव मिळत होता. आठवड्यापासून सोयाबीन तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे, तर दुसरीकडे तीन वर्षात सोयाबीनला भाव चागला मिळतोय; परंतु शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील सोयाबीन शिल्लक नाही. अडचणीतील शेतकऱ्यांना मातामोल भावाने सोयाबान विकावे लागले. ३८०० ते ४२०० रुपयांदरम्यान स्थिर होते.

खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत, मात्र, सध्या दराने ५३०० रुपयांची पातळी गाठली आहे. २०२१-२२ नंतर प्रथमच अशी तेजी पाहायला मिठत आहे. आर्थिक अडचणीमुळे ७० ते ७५ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन आधीच विकून टाकले आहे. आता केवळ मोठ्या शेतकऱ्यांकडे थोडाफार साठा शिल्लक असताना दरवाढ झालेली आहे.

साठेबाजांचा फायदा

शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर दर वाढण्याची ही जुनीच पद्धत यंदाही पाहायला मिळत आहे. आता व्यापाऱ्यांकडील आणि साठेबाजांकडील सोयाबीनला चांगला दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान आणि साठेबाजांचा फायदा अशी स्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT