भाव नसल्याने मेथी व्यापाऱ्यांना फुकट file photo
जालना

भाव नसल्याने मेथी व्यापाऱ्यांना फुकट

पिंपळगाव रेणुकाईच्या आठवडी बाजारातील चित्र

पुढारी वृत्तसेवा

Fenugreek is free for traders due to lack of price

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारात मेथीला भाव नसल्याने शेतकऱ्यांने विक्रीस आणलेली मेथी व्यापाऱ्यास फुकट वाटली.

पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारात शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने बाजारात खरेदी विक्रीसाठी येतात. मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

एका महिन्याच्या आत येणारे पीक असलेल्या मेथीची परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. कमी खर्चात जवळपास एकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च मेथीसाठी येतो. त्यामुळे मेथीची लागवड बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात.

यावर्षी सुरुवातीपासूनच मेथीला बाजारात भाव नसल्याने मेथी तोडणी ते बाज- ारापर्यत आणण्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मेंथी फुकट देणे पसंत केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने मेथीला दररोज पाणी द्यावे लागत आहे. मेहनत व खर्च करूनही बाजारात मागणी नसतांना मेथीची आवक वाढली आहे. मेथीला भाव मिळत नसल्याने मेथी परत नेण्यापेक्षा शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांना फुकट दिली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT