Farmers learned the lessons of natural farming
जालना, पुढारी वृत्तसेवा : रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, यासाठी जालना जिल्ह्यातील २९ शेतकरी आणि २ कर्मचाऱ्यांचे हैदराबाद येथे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जालनाचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले.
हैदराबाद येथील राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्थेत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या निविष्ठा कशा तयार कराव्यात, याचे सविस्तर धडे देण्यात आले.
या तंत्रज्ञानाचे मिळाले मार्गदर्शनप्रशिक्षणात तज्ज्ञांनी पिकांच्या वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या घटकांवर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्यानेः पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) मायकोरायझा ट्रायकोडर्मा एझोटोबॅक्टर या सारख्या विविध जैविक खतांचा , बुरशीनाशकांचा व कीटकनाशकांचा आणि घटकांचा वापर करून शेती कशी करावी, याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
तज्ज्ञ डॉक्टरांचे लाभले मार्गदर्शनया वेळी संस्थेतील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. शर्मा, डॉ. दामोदर, डॉ. सुनंदा शाहू, डॉ. दामोदर चारी, डॉ. एन. लावण्या आणि डॉ. बी. शैलजा यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाला आत्मा संस्थेचे प्रतिनिधी दत्तात्रेय सूर्यवंशी आणि धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
हैदराबाद येथील राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्थेत या प्रशिक्षण आयोजन करण्यात या प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या निविष्ठा कशा तयार कराव्यात, याचे सविस्तर धडे देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे जालना जिल्ह्यातील नैसर्गिक शेतीला मोठी गती मिळेल.- अमोल आगवण, प्रकल्प संचालक आत्मा.