Agriculture News : तीन एकर मिरची पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर!” “लाखोंचा खर्च, उत्पादन अन् भावही नसल्याने उभे पीक जमिनीत गाडले.. file photo
जालना

Agriculture News : तीन एकर मिरची पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर!” “लाखोंचा खर्च, उत्पादन अन् भावही नसल्याने उभे पीक जमिनीत गाडले..

रोगराई आणि कमी बाजारभावाने शेतकरी हतबल; ३ एकर मिरची पीक नाइलाजाने केले नष्ट

पुढारी वृत्तसेवा

Farmer runs rotavator over three-acre chili crop!

सादिक शेख

आन्वा : पुढारी वृत्तसेव भोकरदन तालुक्यात यंदा मिरची पिकावर रोगराई आणि प्रतिकूल हवामानाचा परिणाम झाला आहे. यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसला आहे. भोकरदन तालुक्यातील कारलावाडी येथील शेतकरी साईनाथ शिंदे यांनी आपल्या तीन एकरावर मिरची पिकाची लागवड करण्यात आली होती.

परंतू यंदा या पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई व पावसाची तूट यामुळेअपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्‍यातच बाजारभाव मिळत नसल्याने साईनाथ शिंदे या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर उभ्या मिरची पिकावर रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मशागत, रोपे, खते, मल्चिंग पेपर, औषधफवारणी, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च केला. मात्र पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच बाजारभाव समाधानकारक नसल्याने मिरची पीक टिकवणेही शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे.

उत्पादन खर्चही निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी नाइलाजास्तव उभ्या मिरची पिकावर रोटाव्हेटर फिरवून पीक जमिनीत गाडले. वर्षभराची मेहनत आणि केलेला खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शासनाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT