October Heat : मुंबईत उष्णतेची लाट, ऑक्टोबर हिट’चा आरोग्यावर परिणाम

दिवसा तीव्र सूर्यप्रकाश आणि रात्री सौम्य गारवा यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे.
October Heat
October Heat : मुंबईत उष्णतेची लाट, ऑक्टोबर हिट’चा आरोग्यावर परिणामfile photo
Published on: 
Updated on: 

Heat wave in Mumbai for next 2 days, health impact of October hit

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबईत पुढील ३ दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागांत मान्सून नेहमीपेक्षा उशिरा परतत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

October Heat
Central Railway Megablock : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; प्रवाशांचे हाल

मुंबईत यापूर्वी ५ दिवस आधीच पाऊस परतला असल्याचे नोंद आहे. २००२ मध्ये मान्सून ३० सप्टेंबर रोजी परतला होता, तर यंदा मान्सून परतण्याची तारीख ८ ऑक्टोबर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुंबईकरांना सध्या तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने उकाडा वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान दमट आणि तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे.

ठाणे आणि मुंबईत ६ आणि ७ ऑक्टोबरपासून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तापमान आणि आर्द्रतेचा परिणाम तापमान आणि आर्द्रतेतील अचानक वाढीचा शरीराच्या तापमान नियंत्रण प्रणालीवर थेट परिणाम होऊ शकतो.

October Heat
Sanjay Raut : "केवळ ज्ञानेश कुमार पदावरून पायउतार होणार नाहीत..." : गर्जना मोर्चावर संजय राऊत काय म्हणाले?

दिवसा तीव्र सूर्यप्रकाश आणि रात्री सौम्य गारवा यामुळे हवेत आर्द्रता वाढली आहे. यामुळे घाम, डिहायड्रेशन, थकवा, डोकेदुखी आणि चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

‘ऑक्टोबर हीट’चा आरोग्याला धोका

मुंबईकरांच्या आरोग्यावर ‘ऑक्टोबर हीट’चा परिणाम होण्याची शक्यता आहे.तापमानातील प्रचंड फरकामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन सर्दी, खोकला आणि घशाचा संसर्ग होऊ शकतो.

घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी झाल्यास डिहायड्रेशन, उष्माघात आणि चक्कर येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अतिरिक्त आर्द्रतेमुळे त्वचेवर पुरळ, घामोळे आणि फंगल इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

कुलाब्यात कमाल ३६.५ अंश तापमानकुलाब्यात शनिवारी कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.५ अंश सेल्सिअसने अधिक होते. कुलाब्यातील ३६.५ अंश सेल्सिअस तापमान सरासरीपेक्षा ५.६ अंशांनी अधिक असल्याचेही वृत्तात नमूद आहे. २०१३ नंतर ऑक्टोबर महिन्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागातील वरिष्ठ तज्ञांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news