ST Bus Accident : धावत्‍या एसटीची पुढची दोन्ही चाके निखळली, बस सुमारे २० फूट फरफटली, प्रवाशांमध्ये घबराट..

जुने कायगावजवळ थरारक घटना; चालकाने प्रसंगावधानामुळे सुदैवाने जीवितहानी नाही
ST Bus Accident
ST Bus Accident : धावत्‍या एसटीची पुढची दोन्ही चाके निखळली, बस सुमारे २० फूट फरफटली, प्रवाशांमध्ये घबराट..file photo
Published on: 
Updated on: 

Both front wheels of a running ST bus came off, panic among the passengers

गंगापूर, रमाकांत बन्सोड : छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे शनिवारी (ता. ३) दुपारी धावत्या एसटी बसचा ॲक्सलमधून उजव्या बाजूचा टायर अचानक निखळल्याने थरारक घटना घडली. टायर निखळल्यानंतर बस काही अंतर अॅक्सलवर फरफटत गेली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ST Bus Accident
Virat Garjana Morcha: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज ठाकरे बंधूंचा मोर्चा; काँग्रेस आणि शरद पवार गटाचाही पाठिंबा

छत्रपती संभाजीनगरहून दुपारी पावणे दोनच्या सुमारास शिरूरकडे निघालेली ही बस जुने कायगावजवळ आली असता हा प्रकार घडला. गाव जवळ आल्याने चालकाने बसचा वेग सुमारे ४० किलोमीटर प्रतितासपर्यंत कमी केला होता. त्याचवेळी धावत्या बसच्या अॅक्सलमधून पुढील उजव्या बाजूचा टायर निखळून रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. त्यानंतर दुसऱ्या बाजूचाही टायर निखळल्याने बस थेट अॅक्सलवर आदळली आणि सुमारे २० फूट फरफटत गेली.

या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. काही प्रवाशांना किरकोळ मुक्का मार लागला. मात्र गंभीर दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून मागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

अपघातग्रस्त बस (एमएच १४ एमएच ७०२५) शिरूर आगाराची असून ती छत्रपती संभाजीनगर–नेवासा फाटा–अहिल्यानगर–शिरूर–पुणे मार्गावर धावत होती. चालक व्ही. के. शेळके व वाहक ए. एस. माने हे कर्तव्यावर होते.

ST Bus Accident
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश! २० वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचार प्रकरणी नेमके कोणते आरोप?

घटनेची माहिती मिळताच गंगापूर एसटी आगाराचे आगारप्रमुख विजय बोरसे, वाहन परीक्षक व्ही. के. कुकलारे व हेड मेकॅनिक साठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसची पाहणी करून चालक व वाहकांकडून घटनेची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साहाय्याने बस हटविण्याचे प्रयत्न सुरू होते.

‘तांत्रिक बिघाड; चालकाचा दोष नाही’

तांत्रिक बिघाडामुळे सदरील प्रकार घडला असून, यात चालकाचा दोष नाही. गाडीतील नेमका दोष तपासणीनंतर स्पष्ट होईल. याबाबत ऑनलाइन तक्रार करून शिरूर आगार तसेच संबंधित लेलंड कंपनीला माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती गंगापूर आगारप्रमुख विजय बोरसे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news