Jalna Crime News : डायल ११२ वर खुनाच्या गुन्ह्याची खोटी माहिती, गुन्हा दाखल File Photo
जालना

Jalna Crime News : डायल ११२ वर खुनाच्या गुन्ह्याची खोटी माहिती, गुन्हा दाखल

शहरातील बारवाले महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेवर भांडणातून एकाचा खून झाला असल्याचा कॉल ११२ क्रमांकावर करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

Fake information about murder on dial 112

जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील बारवाले महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेवर भांडणातून एका जणांचा खून झाला असल्याचा कॉल ११२ क्रमांकावर करण्यात आला होता. चंदनझिरा पोलिसंनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली असता तेथे खुनाचा कोणताही गुन्हा झाला नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी खुनाचा खोटा कॉल करणाऱ्या इसमाविरुध्द चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाण्यात जालना शहरातील चंदनझिरा पोलिस बारवाले महाविद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर अंदाजे १५ वर्षे वयाची व्यक्तीचे भांडण सुरु असुन या भांडणात खुन झाल्याने पोलीस मदत हवी आहे असा कॉल ११२ नंबर वर आला होता. कॉलवर मिळालेली माहीती गंभीर स्वरुपाची असल्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तात्काळ त्त्यांच्या स्टाफसह बारवाले महाविद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर जावुन पाहणी केली.

यावेळी पोलिसांनी आजुबाजुच्या नागरीकांना भांडण व खुनाबाबत विचारणा केली. डायल ११२ वर प्राप्त झालेल्या माहीती प्रमाणे कोणतीही घटना सदर ठिकाणी घडली नसल्याचे नागरीकांच्या संवादातुन आढळुन आले. पोलिसांनी डायल ११२ वर कॉल करणाऱ्या ईसमास कॉल केला असता सदर ईसमाने त्याचा मोबाईल फोन बंद केला असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे कॉल करणाऱ्याने पोलीसांना खोटी माहीती दिली असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी कॉल करणाऱ्या ईसमा बाबत अधिक माहीती घेतली यावेळी तपासात सदर ईसम समाधान अंकुश डोळसे (रा. मानदेवुळगाव ता. बदनापुर) येथील असल्याचे निष्पन्न झाले. सदर व्यक्तीने पोलीसांना खुन झाल्या बाबतची खोटी माहीती दिल्याने त्याच्या विरुध्द चंदनझिरा पोलिस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT