

Woman robs car owner of Rs 95,000 by taking money via QR code
जालना, पुढारी वृत्तसेवा : बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार मालकाकडून अनोळखी महीलेने कयूआर कोडवर पाच हजार रुपये मागवून घेऊन त्यानंतर साथीदाराच्या मदतीने त्याच्याजवळील एक आयफोन, रोख दहा हजार रुपये असे ९५ हजारांचा मुद्देमाल लुटणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील रहिवाशी व सध्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे राहणारे उध्दव निवृत्ती बनकर यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात ३० जुन रोजी फिर्याद दिली की, त्यांना एका अनोळखी महिलेने क्युआर कोडवर पाच हजार रुपये मागवून घेतले.
त्यानंतर दोन अनोळखी व्यक्तीच्या साह्याने पूर्वतयारी करुन कट रचून महिलेने फिर्यादीच्या स्कॉरपिओ गाडी मध्ये बळजबरीने घुसून उध्दव बनकर यास मारहाण करीत त्याच्या खिशातील दहा हजार रुपये रोख, ८० हजारांचा अॅपल कंपनीचा आयफोन हिसकावून घेतला. यावेळी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या आरोपावरून एका महिलेसह दोन अज्ञात आरोर्पीविरुध्द बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस गुन्ह्यातील अज्ञात महिला व दोन अज्ञात आरोपींचा शोध घेत असतांना त्यांना खबऱ्याने माहीती दिली कि, सदर गुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी उगले येथील एका महीलेसह दोन पुरुष साथीदारांच्या सहाय्याने केला.
पोलिसांनी संशयीत महीलेसह आरोपींना जेरबंद केले असुन त्यांच्या ताब्यातुन १५ हजार रुपये रोख व ८० हजाराचा आयफोन मोबाईल व ओपो कंपनीचा मोबाईल असा पंचाण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिला आर- ोपीस पुढील तपासासाठी बदनापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक पंकज जाधव व पथकाने केली आहे.