Jan-Aakrosh Morcha : जाफराबादच्या जनआक्रोश मोर्चाची जय्यत तयारी filephoto
जालना

Jan-Aakrosh Morcha : जाफराबादच्या जनआक्रोश मोर्चाची जय्यत तयारी

एससी उपवर्गीकरणाविरोधातील मोर्चात ५० हजारांहून अधिक समाजबांधवांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Elaborate preparations for the 'Jan-Aakrosh Morcha' in Jafrabad

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जाफ्राबाद येथे मंगळवारी (दि. २८) रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची तयारी पुर्ण झाली आहे. तालुक्यातील ५० हजाराहून अधिक समाजबांधव या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या मोर्चाचे आयोजन समस्त बौद्ध समाज व एससी उपवर्गीकरण विरोधी समन्वय समिती जाफ्राबाद तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे. समाज बांधवाच्या मते अनुसुचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणारा असून, संविधानाने दिलेल्या समान हक्कांच्या तत्त्वाशी विसंगत आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हा विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.

मोर्चामध्ये तालुक्यातील १०० गावांतील बौद्ध समाज, सामाजिक संघटना, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मोर्चा शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार असून, त्यानंतर शासनाच्या नावाने तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.

एससी उपवर्गीकरणाविरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक गावातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त बौद्ध समाज व एससी उपवर्गीकरण विरोधी समन्वय समिती, ता. जाफ्राबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या मोर्चात समन्वयकापैकी कोणीही सूत्रसंचालन अथवा स्वागत करणार नाही, मुख्या विचार मंचावर बसणार नाही, कोणीही स्वतःला व्हीआयपी म्हणून समाजापेक्षा वेगळ्या असणावर बसणार नाही त्याचबरोबर शासन व प्रशासनाला निवेदन समाजाच्या वतीने लहान बालके देणार आहे.

साखळी उपोषण

उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी मागील दिड महिन्यांपासून तहसील कार्यालयासमोर दररोज तालुल्यातील १०० गावांमधुन एक-एका गावातील महिला आणि पुरुष यांच्या सामुदायिक सहभागात समस्त बौद्ध समाज बांधवांच्या सहभागातून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. तर २७ जुलै सोमवार रोजी सिंधी येथील समाज बांधवांनी साखळी उपोषण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT