Jalna Rain News : यलो अलर्ट, तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत रविवारपर्यंत २७१ मिमी पावसाची नोंद
Rain Alert
Jalna Rain News : यलो अलर्ट, तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षाFile Photo
Published on
Updated on

Yellow alert, yet still awaiting heavy rain

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यात यंदा पावसाळ्याला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाने काही दिवस दडी मारली. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. रविवारी (दि. २६) जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट दिलेला असतानाही बहुतांश भागात हलक्या सरींचीच हजेरी राहिली. मोठ्या पावसाअभावी पाणी साठ्यात अपेक्षित वाढ झालेली नसल्याने विहीरी व बोअरसह तलावातील पाणी पातळी उन्हाळ्यात होती तशीच आहे.

Rain Alert
Jalna News : कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील १ लाख ७५ शेतकरी ठरले पात्र

जालना जिल्ह्यात २६ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार १ जून ते २६ जुलैदरम्यान २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीतील अपेक्षित पाऊस २७२.२ मिमी असून, जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या ९९.६ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, मागील वर्षी याच कालावधीत २९३.६ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची तूट आहे.

तालुकानिहाय पाहता जालना तालुक्यात ३१२.४ मिमी, बदनापूर २९५.१, भोकरदन २४१.१, जाफराबाद २५२.८, परतूर २८०, मंठा २७६.३, अंबड २६६.३ आणि घनसावंगी तालुक्यात २५३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बदनापूर, परतूर व अंबड तालुक्यांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत पावसाची नोंद झाली आहे; मात्र इतर तालुक्यांत अपेक्षित पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे.

Rain Alert
Jalana News : विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ..! 10-12 लाखांचा चुराडा? दोनदा मलमपट्टी करूनही 'महाराजा गेट' निकामी

रविवारी मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी केवळ २ मिमी पाऊस झाला. जाफराबादमध्ये ३.२, भोकरदन व घनसावंगीमध्ये २.९, बदनापूरमध्ये २.५, परतूरमध्ये २.४, जालन्यात १, मंठ्यात ०.४ आणि अंबडमध्ये अवघा ०.३ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.

पावसाने सरासरी गाठली असली तरी दमदार सरींचा अभाव असल्याने जलसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस झाला तरच मध्यम व लघु प्रकल्पांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, पावसाच्या दमदार सरींची प्रतीक्षा कायम आहे.

तालुकानिहाय पाऊस

जिल्ह्यात तालुकानिहाय २६ जुलैपर्यंत पडलेला पाऊस (मिमी) मधे पुढील प्रमाणे जालना - ३१२.४, बदनापूर - २९५.१, परतूर - २८०, मंठा - २७६.३, अंबड -२६६.३, जाफराबाद - २५२.८, घनसावंगी - २५३.६, भोकरदन - २४१.१मीमी पडला आहें.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news