Jalna News : घरगुती गॅसचे दर वाढले; ग्रामीण भागात पेटल्या चुली file photo
जालना

Jalna News : घरगुती गॅसचे दर वाढले; ग्रामीण भागात पेटल्या चुली

शहरात गॅस शेगडीशिवाय : स्वयंपाकाची कल्पनाही करवत नाही. मात्र ग्रामीण भागात आजही चूलच संसाराची आधार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Domestic Gas Prices Rise; Traditional Wood Stoves Rekindled in Rural Areas

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा शहरात गॅस शेगडीशिवाय : स्वयंपाकाची कल्पनाही करवत नाही. मात्र ग्रामीण भागात आजही चूलच संसाराची आधार आहे. गॅस सिलिंडरचे वाढते दर, अनुदानात कपात आणि वेळेवर सिलिंडर न मिळण्याच्या समस्येमुळे ग्रामीण भागातील महिला पुन्हा स्वयंपाकासाठी चुली पेटवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात सकाळी व संध्याकाळ चुली पेटल्यामुळे घरातून धुर निघतानाचे चित्र हमखास दिसत आहे. चुलीत जाळण्यासाठी डोक्यावर सरपणाचा भारा घेऊन महिला शेताच्या बांधावरून जाताना दिसत आहेत. ओढ्याच्या काठावरून सरपण गोळा करून महिला सकाळी व रात्रीची चूल पेटवीत आहेत. कापसाच्या काड्या, तुरीच्या काड्या, शेतातील वाळले गवत व जळणासाठी लाकडे गोळा करून आणून त्यावर चूल पेटवली जात आहे.

गॅसचा एक सिलिंडर हजार रुपयांच्या घरात गेल्याने ग्रामीण भागात गॅस सिलिंडर खरेदी करणे चैनीचे झाले आहे. गॅस सिलिंडर विकत घेतल्याचे महिन्याचे वजेट कोलमडत आहे. त्यातच अनेकदा एजन्सीकडे गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने आठ आठ दिवस गॅस मिळत नाही.

अशावेळी चूल हाच एकमेव आधार ठरत आहे. चुलीवर केलेल्या स्वयंपाकाला वेगळीच चव असते, असा ग्रामीण भागातील जनतेचा अनुभव आहे. मात्र सरपणासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत असतानाच धुरामुळे महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागात उज्ज्वला योजन-`तून गॅस जोडण्या मिळाल्या, पण महागाईमुळे सिलिंडर भरणे परवडत नसल्याने अनेक घरात गॅस शेगडी शोभेची वस्तू बनली आहे.त्यामुळे नाइलाजाने का होईना, पिंपळगाव रेणुकाईसारख्या ग्रामीण भाग पुन्हा सरपण युगाकडे वळला आहे.

शेतमालाला भाव नसल्यामुळे सध्या गॅस आणण्यासाठीही मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण येत आहे. गॅस वेळेवर मिळत नसल्यामुळे आम्ही सरपनाचा वापर करत आहे.
-रविता समाधान तायडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT