LPG gas shortage Nanded : पेट्रोलचा प्रश्न मिटला,गॅस सिलिंडरची टंचाई कायम

वेटिंगच्या फंड्याने नांदेड शहरातील ग्राहकांची फरपट
Gas Shortage
Gas ShortagePudhari
Published on
Updated on

नांदेड : आखाती देशातील युध्दामुळे सर्वत्र गॅस व पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे. हे सत्य असले तरी, पेट्रोलवरून निर्माण झालेल्या प्रश्नाची सोडवणूक प्रशासनाने केली आहे त्यामुळे पेट्रोलपंपावरील रांगा कमी झाल्या आहेत. मात्र, घरगुती गॅसच्या कृत्रिम टंचाईच्या झळा वरचेवर तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उद्भवलेल्या पेट्रोल टंचाईचा प्रश्न मिटला मात्र, गॅस सिलिंडर टंचाईचा प्रश्न मिटत नसल्याने सर्वसामान्यांची फरपट सुरूच आहे.

नांदेड जिल्ह्यात इंडेन, हिंदुस्थान व भारत पेट्रोल या तीन प्रमुख कंपन्यांच्या घरगुती गॅस सिलिंडरचे जवळपास साडेसात लाख ग्राहक आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी व जिल्हा पुरवठा डॉ. जगदीश बारदेवाड यांनी जिल्ह्यातील वितरकांची बैठक घेऊन घरगुती गॅस ग्राहकांना घरपोच सिंलिडर द्या अशा सूचना दिल्या मात्र, या सूचनांना वितरकांनी केराची टोपली दाखविल्याचे चित्र असून, आजही ग्राहक वितरकांच्या गोडाऊनजवळ तासन्‌‍तास लाईन लावून बसत आहेत.

Gas Shortage
Gas Cylinder Supply Satara: टंचाईच्या धास्तीने जिल्हा ‌‘गॅस‌’वर

व्यावसायिकाकडून घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होत असून, यावर आळा घालण्यासाठी पुरवठा विभागाने तयार केलेली पथके कुठे आहेत असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पथकांनी किती तपासण्या केल्या आणि किती कारवाया केल्या याबाबतची माहिती घेतल्यास जिल्ह्यात केवळ पाच ते सहा ठिकाणी घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केल्याची बाब पुढे आली आहे.

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात गॅस सिलिंडर असल्याचा दावा होत असला तर मग गॅस बुकिंग होण्यास काय अडचण आहे. बुकिंग झाली तर गॅस ग्राहकांना घरापर्यंत का मिळत नाही. असा ही प्रश्न या निमित्ताने ग्राहकांतून विचारला जात आहे.

Gas Shortage
LPG Gas News : शहरातील दीड लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत

जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत घरगुती गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई भासत आहे. युध्द थांबत नसल्याने त्याची तीव्रता अधिक भासणार आहे. त्यामुळे अनेकजण गॅस सिलिंडरचा आवश्यकतेपेक्षा जास्त साठा करून ठेवत आहेत.

वशिले बाजीचे प्रकार ही वाढले आहेत राजकीय पदाधिकारी व आधिकारी वर्गांच्या शिफारसीवरून वितरकांना गॅस सिलिंडर देण्याचे प्रकार ही घडत असल्याचे दिसते. त्यामुळे वितरकांवर याचा ताण पडत आहे. ही बाब नाकारता येणार नाही.

गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करणाऱ्या पुरवठा विभागाने वितरकांच्या दुकान, गोडाऊन बाहेर ग्राहकांच्या लागलेल्या रांगा दिसत नाहीत का संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांतून केला जात आहे. विशेष म्हणजे अनेकांनी गॅसला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी, इंडक्शन, चुलीचा पर्याय स्वीकारला असला तरी गॅस सिलिंडरची सवय लागलेल्यांना आता इतर पर्यांय पचनी पडत नाहीत त्यामुळे काहीही करून गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी ग्राहक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने दखल घेऊन घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई मोहीम तीव्र करावी व ग्राहकांना घरपोच सिलिंडर देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वेटिंगचा फॉर्म्युला ....

मुदत संपल्यानंतर गॅस सिलिंडर बुकिग करण्यासाठी कंपन्यांचा ऑनलाईन क्रमांक (ओटीपी ) येत नाही काही दिवस प्रयत्न केल्यानंतर बुकिंग होऊन ओटीपी आला तरी ग्राहकांला सिलिंडर घरपोच मिळत नाही. वितरकाकडे गेले तर ते आपला नंबर वेटिंगवर आहे. आधीचे ग्राहक झाल्यानंतर आपल्याला 10 ते 15 दिवसांनंतर सिलिंडर येणार असे सांगत आहेत. त्यामुळे वेटिंगचा फॉर्म्युला हा कुणाच्या सोयीचा आहे, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news