Jalna News : मोती तलाव येथे आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव प्रशिक्षण उत्साहात file photo
जालना

Jalna News : मोती तलाव येथे आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव प्रशिक्षण उत्साहात

या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले होते.

पुढारी वृत्तसेवा

Disaster management search and rescue training in full swing at Moti Lake

जालना, पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष आशिमा मित्तल व निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड येथे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव साहित्य हाताळणी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्विरीत्या संपन्न झाला.

या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले होते. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत अग्निशमन विभाग तसेच होमगार्डस् दलातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक आधुनिक शोध व बचाव साहित्य हाताळ णीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नव्याने खरेदी करण्यात आलेल्या विविध आपत्कालीन साहित्याच्या वापर, देखभाल व सुरक्षित हाताळणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान फायबर बोट ४, रबर बोट ३. स्कुबा सेट २, फायर जेल ब्लॅकेट २०, लाईफबोये १००, बॅटरी कटर ९, बॅटरी स्प्रेडर ९, फ्लोटिंग पंप १०, पोर्टेबल जनरेटर ४, पोर्टेबल पंप १०, मेगाफोन २०. सेफ्टी नेट १०, लाईफ जॅकेट २२५ रिफ्लेक्टर जॅकेट २२५ आदी साहित्यांचा समावेश होता.

सदर साहित्य मनपा तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत अग्निशमन विभागांना उपलब्ध करून देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शशिकांत हदगल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर, प्रभारी अग्निशमन अधिकारी, संदीप दराडे, अग्रिशमन विभाग, भोकरदन, परतूर व अंबड नगर परिषद अग्निशमन विभाग, बदनापूर, जाफराबाद, मंठा, घनसावंगी आदीची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT