शहरातील प्री-मॅच्युअर मृत बाळाचे देहदान !

दुःखातूनही दहीभाते कुटुंबाचा समाजापुढे आदर्श
jalna news
शहरातील प्री-मॅच्युअर मृत बाळाचे देहदान !file photo
Published on
Updated on

Body donation of a prematurely dead baby in the jalna city!

जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरात प्रथमच प्री-मॅच्युअर मृत बाळाचे वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान करण्यात आल्याची स्तुत्य घटना घडली आहे. सोनाली उदय दहीभाते यांना १० फेब्रुवारी रोजी प्री-मॅच्युअर बाळाचा जन्म झाला होता. जन्मानंतर प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बाळाला संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथील एनआयसीयू विभागात दाखल करण्यात आले होते.

jalna news
Jalna News : कुंडलिका नदीला जलपर्णीचा विळखा

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बाळाला वाचविण्यात अपयश आले. या दुःखद प्रसंगातही बाळाचे वडील डॉ. उदय दहीभाते यांनी समाजापुढे आदर्श ठेवत मृत बाळाचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी बाळाचा देह जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुपूर्द करण्यात आला आहे. या बाळाचा देह विद्यार्थ्यांच्या संशोधनाला कामी येणार आहे.

या स्तुत्य उपक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणाला मोठी मदत होणार असून देहदानाबाबत समाजात जनजागृती होण्यास निश्चितच चालना मिळणार आहे. जालना शहरात घडलेल्या या घटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

jalna news
नैसर्गिक शेतीला जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे बळ

देहदानाचा निर्णय यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय डॉ. बळीराम बागल, डॉ. कैलाश राजगुरू व डॉ. शिवदास मिरकड व डॉ सहिदा अफरोज, डॉ. प्रतिमा कुलकर्णी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news