Jalna News : उसतोड महिलांना भाजीपाला लागवडीचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, नैसर्गिक शेतीला चालना  File Photo
जालना

Jalna News : उसतोड महिलांना भाजीपाला लागवडीचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, नैसर्गिक शेतीला चालना

बहरत आहेत परसबागा

पुढारी वृत्तसेवा

Direct guidance of vegetable cultivation to Sugarcane Cutting women

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : जुन्या काळात घराच्या परिसरात सांडपाण्यावर भाजीपाला घ्यायची पध्दत होती. कुडाच्या शेजारी वेलवर्गीय मुळा, कारले, मिरची, लसूण आदी भाजीपाला घेतला जात असे. आता मात्र, रासायनिक पध्दतीने पिकविलेल्या भाजीपाल्यातून आजार बळावण्याची दाट शक्यता असल्याने पुन्हा नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी परसबाग संकल्पना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. यामुळे घनसावंगी तालुक्यात या पसरबागेचे चांगले काम होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मराठवाड ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर व उसतोड कामगार आरोग्य व पोषन खात्रीशीर सेवा प्रकल्पांतर्गत परतूर घनसावंगी तालुक्यातील ३० गावांतील हंगामी स्थलंतर कुटुंबांना आरोग्य पोषन मिळाले. त्यासाठी त्याना किचन गार्डन किट वाटप करण्यात आली. या किचन गार्डन कशा प्रकारे त्याची निगा, काळजी घ्यावे व योग्य पालनपोषण करून उत्पादन झालेले भाजीपाला आपल्या कुटुंबातील नागरिकांनी त्याचे सेवन करून आपल्या शरीरातील आवश्यक घटक आपण आपल्या घरासमोर लावलेल्या परसबागातून मिळणार आहे.

ऊसतोड कामगारांसाठी संस्थेच्या वतीने मोफत बियाणे उपलब्ध करून दिले आहे. यावेळी मराठवाड ग्रामीण विकास संस्थेचे संचालक अप्पासाहेब उगले, जिल्हा संपर्क अधिकरी भाऊसाहेब गुंजाळ, प्रकल्प व्यवस्थापक अश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर आणि घनसावंगी तालुक्यातील ३० गावात उसतोड कामगारांना परसबागेचे महत्त्व सांगण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून या तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या घरासमोर परसबागा बहरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासाठी प्रशिक्षक तथा जिल्हा समन्वयक एकनाथ राउत, सुरेखा वाघमारे, राजेश वाघमारे, अजय गाढे, आकाश चौगुले योगेश आढे, महादेव खरात आदी परिश्रम घेत आहेत.

कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत

परस बाग खूप महत्त्वाची आहे. यामुळे आपल्याला ताजी आणि पौष्टिक भाजीपाला मिळतो, तसेच पर्यावरणासाठीही चांगली आहे. परस बागेचे महत्त्वः ताजीआणि पौष्टिक भाजीपाला मिळतो. परसबागेत पिकवलेला भाजीपाला ताजे असल्याने त्यात पोषक तत्त्वांचे प्रमाण अधिक असते. आर्थिक बचतः बाहेरून भाजीपाला खरेदी करण्याची गरज नसल्यामुळे पैसे वाचतात. पर्यावरणासाठी चांगली: परसबाग पर्यावरणासाठी चांगली असते कारण कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. परसबागेत काम करणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहते. परसबाग घराच्या आवारात सुंदरता वाढवते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT