Jalna News : पशुसंवर्धनच्या जीर्ण खोल्या धोकादायक file photo
जालना

Jalna News : पशुसंवर्धनच्या जीर्ण खोल्या धोकादायक

लघुशंकेसाठी वापर, परिसरात घाण व डासांचा प्रादुर्भाव, ग्रामस्थ त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

Dilapidated Animal Husbandry Department rooms are dangerous

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील जीर्ण झालेल्या पशुसंवर्धन दवाखान्याच्या खोल्यांमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जीर्ण झालेल्या या खोल्या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने पाडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.

टेंभुर्णी येथील पशुसंवर्धन विभागाच्या खोल्या. अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून इमारतीत घाण व कचरा साचला आहे. साप, विंचू व डासांचे प्रजनन केंद्र बनले आहे. ही इमारत कधीही कोसळून दुर्घटना होऊ शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायत कार्यालय टेंभुर्णीला इमारत पाडण्याची परवानगी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. सदर जुन्या पशुसंवर्धन दवाखान्या शेजारी पोलिस स्टेशन व बस थांबा तसेच सार्वजनिक वाचनालय तर दुसऱ्या बाजूने लोकवस्ती आहे. अगदी मोक्याच्या असलेल्या पशुसंवर्धन दवाखान्याच्या या खोल्यांमधे नागरिक लघुशंका व प्रातः विधी करीत आहेत. अनेक जण या ठिकाणी कचरा आणून टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

पशुसंवर्धन विभागाचा जुना दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. भिंतींना तडे गेले असून छताचा काही भाग कोसळला आहे. कोणत्याही क्षणी येथे मोठी दुर्घटना घडू शकते.

जुन्या पशुसंवर्धन दवाखान्याची इमारत पाडण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव पारीत करून वरिष्ठांना कळविले आहे. जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल द्यावा.
- जगदीश आढाव, प्रशासक ग्रा प टेंभुर्णी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT