Jalna Rain | तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी संघटनेची मागणी  File Photo
जालना

Jalna Rain | तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी संघटनेची मागणी

घनसावंगी : शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे केली मागणी

पुढारी वृत्तसेवा

Declaring a wet drought in the taluka, demands farmers organization

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सततचा पाऊस व दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली आहे. शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने खरीप हंगामाती पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले की, घनसावंगी तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अतिशय जास्त असून तालुक्यातील सर्व छोटे मोठे तलाव पूर्ण भरलेले आहेत. तसेच सर्व नदी नाल्यास आलेल्या पुरामुळे तसेच सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे. तसेच जास्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गान काढून घेतलेला असून या पावसामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या उत्पादनातही जवळपास ८५ ते ९०% घट झालेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तसेच गोदावरी नदीस आलेल्या पुरामुळे तसेच गोदा वरी पात्रातील बंधाऱ्यांच्या दरवाजांचे मेंटेनन्स वेळेत होत नसल्यामुळे गोदाकाठच्या सर्व गावांत पाणी शिरत आहे. तसेच बंधाऱ्यांच्या दरवाज्यांचे मेंटेनन्सचे काम वेळेत केल्यास पाण्याचा विसर्ग लवकर होतो व पाणी गावात शिरत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तालुक्यात झालेली अतिवृष्टी पाहता तसेच गोदाकाठच्या गावांची परिस्थिती पाहून तसेच आपले वरिष्ठांस कळवून याप्रकरणी झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामे करण्याचे आदेश देऊन आर्थिक मदत जाहीर करावे तसे संबंधित विभागास कळवून गोदाप् त्रातील बंधाऱ्यांच्या दरवाज्यां मेंटेनन्सचे काम दरवर्षी वेळेवर करू घेण्याबाबतचे संबंधित विभागा आदेश द्यावा तसेच आपण याप्रकरण केलेल्या कार्यवाहीची माहिती आम्हा लेखी पत्र देऊन कळविण्यात याव अशा मागणीचे निवेदन दिले आहे सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सु होता. निवेदनावर सतीश कदम अशोक हेमके, चंद्रकांत धांड यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच् स्वाक्षऱ्या आहेत.

पंचनामे करा

अतिवृष्टीच्या झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला गेला आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT