Dear sisters should do e-KYC, appeals MLA Arjunrao Khotkar
जालना, पुढारी वृत्तसेवा :
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभाथ्यर्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakiba-hin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन जालना विधानसभेचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जालना समिती अध्यक्ष तथा जालना विधानसभा आमदार अर्जुन खोतकर यांनी केले आहे.
या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभमिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, शासनातर्फे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभहस्तांतरणद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास विभागाकडून ई-केवायसी माध्यमातून लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ आहे.
जालना विधानसभा मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचे पात्र असलेले १२८०९६ लाभार्थी आहेत. लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी येत्या ६० दिवसांत ई केवायसी करून घ्यावे ई केवायसीसाठी ६० दिवसांचा अवधी असल्याने कोणीही घाई गडबड करू नये. लाभार्थ्यांनी लिंकवरून स्वतःच्या मोबाईल वरून ई केवायसी करता येईल. लाभार्थीनी कोणीही आर्थिक मागणी करीत असेल तर बळी पडू नये असे आवाहनही आमदार अर्जुन खोतकर यांनी केले आहे.