Crows have become rare even in rural areas; traditional community feasts have become a thing of the past
वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा हिंदू धर्मामध्ये आपल्या पूर्वजांची शांती करण्यासाठी तसे त्यांना वर्षातून एकदा भोजनासाठी पितृ पक्षाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे या पितृपक्षाचे आहे. अनन्यसाधारण महत्त्व पितृपक्षासाठी आवश्यक असलेला कावळा दुर्लभ झाला असून ग्रामीण भागातील पंगती कालबाह्य झाल्याच्या दिसून येत आहे.
यावर्षीचा पितृपक्ष म्हणजेच पितर पाठ २६ सप्टेंबर पासून सुरू झाला असून आता फक्त त्याचे आठ दिवस उरले आहे. परंतु ज्या प्रकारे गेल्या १५ वर्षापूर्वीचा पितृपक्ष व सध्याचा पितृपक्ष यामध्ये खूप अंतर आहे. पूर्वी शहरामध्येच फक्त एकाच व्यक्तीला पितृ पक्षाच्या भोजनासाठी आमंत्रित केले जायचे.
परंतु आता शहरी व ग्रामीण संस्कृतीमध्ये कसलाही फरक राहिलेला नाही. त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागामध्ये गेल्या पाच सात वर्षापूर्वी गावातील पाहुणे तसेच मित्र मंडळी यांना भोजनासाठी आमंत्रित केले जायचे. जवळपास एका घरामधून शंभर ते दीडशे जण जेवण करून जायचे. परंतु आज शेजारच्या घरामध्ये सुद्धा पित असल्याचे माहीत होत नाही. यामुळे पितृपक्षातील पंगती या आता फक्त आठवणीतच उरलेल्या आहे.
त्याचबरोबर पितृपक्षा मध्ये कावळा या पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दहा वर्षांपूर्वी रोज सकाळी उठल्यानंतर कावळ्याचा काव काव आवाज ऐकू येत होता, परंतु ग्रामीण भागामध्ये ही प्रदूषण, मोबाईलचे टावर व सिमेंटची घरे सर्रास उभा राहिल्यामुळे कावळा या पक्षाला नैसर्गिक अधिवासा साठी पोषक असे वातावरण राहिले नाही.
त्याचबरोबर पूर्वी गावामध्ये प्रत्येक घरासमोर एखादी मोठाले झाड असायचे आज त्या झाडांची जागा शहरी भागातील बगीच्यातील वेलींनी घेतली आहे. त्यामुळे कावळ्यांना घरटी करून अंडी घालता येत नाही. त्यामुळेसुद्धा त्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. ग्रामीण भागातील कावळ्याची काव काव आता ऐकू येत नाही.