Drought Inspection : पाहणी करून घेतला दुष्काळाचा आढावा

पिकांचे नुकसान, पंचनामे सुरू, प्रशासनाची शेतशिवारात पाहणी
Drought Inspection
Drought Inspection : पाहणी करून घेतला दुष्काळाचा आढावाfile photo
Published on: 
Updated on: 

Reviewed the drought situation after conducting an inspection

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : पावसाने मोठी ओढ दिल्याने घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी-साकळगाव परिसरात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाअभावी खरीप पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार रमेश पागोटे यांच्यासह महसूल, कृषी, ग्रामविकास व अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मानेपुरी-साकळगाव परिसरातील शेतशिवारात प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.

Drought Inspection
Jalna News : ग्राम रोजगार सेवकांना किमान वेतन लागू करा : सिटू

यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची सद्यस्थिती, पावसाअभावी झालेली हानी, पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम तसेच संभाव्य उत्पादनातील घट याची माहिती घेण्यात आली. अनेक शेतशिवारात पिकांना अपेक्षित पाऊस न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक नोंद करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. पंचनाम्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

मानेपुरी-साकळगाव परिसरातील पाणीटंचाईचाही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने आढावा घेतला. गावातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सध्याचा पाणीपुरवठा, पाण्याचे स्रोत आणि आगामी काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य टंचाईबाबत ग्रामस्थांकडून माहिती घेण्यात आली. पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्यास नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा करण्यात आली. शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीस अधिकारी यांची उपस्थिती होती.

Drought Inspection
Crop Damage Survey : अंबड तालुक्यात पिकांचे पंचनामे अंतिम टप्प्यात

मदतीकडे लक्ष

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन परिस्थितीची पाहणी केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता या पाहणीचा अहवाल शासनदरबारी किती तत्परतेने पोहोचतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

उपाययोजना प्रभावीपणे राबवा

पावसाचा खंड वाढत चालल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ पाहणीपुरते मर्यादित न राहता पंचनाम्यांना गती देऊन शासनस्तरावर तातडीने अहवाल सादर करावा आणि दुष्काळी मदत व पाणीटंचाईवरील उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news