

Cotton production will drop by 60 percent this year
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात यंदा पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाने दडी मारल्याने पिके सुकली असून कापसावर लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करूनही यंदा अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
जून-जुलैमध्ये दमदार पाऊस न झाल्याने कापसाची वाढ खुंटली, तर जुलैअखेरीस झालेल्या पावसाळी कापसाच्या लागवडीला पुरेसा कालावधी मिळाला नाही. श्रावण महिन्यांपासून ही पावसाने दडी मारल्याने पिके सुकली असून उन्हाळी कापसावर लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करूनही यंदा अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
शेतकऱ्यांनी जून महिन्यात विहिरीच्या तोकड्या पाण्याच्या आधारावर ठिबक सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. मात्र, पिकांच्या वाढीच्या काळात दमदार पाऊस झाला नाही. त्यात विहिरीही आटल्याने झाडांची वाढ खुंटली. बोंडांची संख्या कमी राहिल्याने एकरी केवळ दोन ते तीन क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. पावसाळी कापसाचे उत्पादन मात्र शून्यावर येण्याची स्थिती आहे.
पावसाळ्यात पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाटचाने खालावत आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने विहिरींची जलपातळी खोल गेली आहे. रोगराईमुळे खर्च वाढला रिमझिम पाऊस आणि सतत बदलणाऱ्या हवामानामळे पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढले. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशके व इतर औषधांवर अतिरिक्त खर्च करावा लागला. श्रावणात पाऊस नसल्याने बोंडे तयार होण्याच्या अवस्थेतील कापसावर लाल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले.
हंगाम लवकर संपणार
रब्बी हंगामावरही संकट दरवर्षी डिसेंबर-जानेवारीपर्यंत सुरू राहणारा कापसाचा हंगाम यंदा दिवाळीपूर्वीच संपण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खब्बी हंगामासाठी जमिनीत पुरेसा ओलावा व पाणीसाठा उपलब्ध होईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांच्या आशाही धूसर झाल्या आहेत.