Ghansawangi Drought : पिके करपली, जलस्रोत आटले; शेतकऱ्यांच्या ताटात माती file photo
जालना

Ghansawangi Drought : पिके करपली, जलस्रोत आटले; शेतकऱ्यांच्या ताटात माती

घनसावंगी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ! युवा शेतकरी संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Crops withered, water sources dried up; Soil on the farmers' plates

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे. पावसाने दडी मारल्याने घनसावंगी तालुक्यात खरीप पिके अक्षरशः करपू लागली आहेत. कपाशीची पाने कोमेजली, सोयाबीनची वाढ खुंटली, तुरीवर संकट घोंघावत आहे. यंदा निसर्गान शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली आहे. यामुळे घनसावंगी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी युवा शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात शुक्रवार, दि. १८ रोजी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले, की यंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामावर संकट कोसळले आहे. या वेळी ढाकेफळ, मासेगाव, दाई अंतरवाली, राठी अंतरवाली, चापडगाव, बोरगाव, जिरडगाव, घनसावंगी आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते.

अजून शाळा वाढणार

तलाव, पाझर तलाव, बंधारे आणि नाले आटल्याने जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पेरणीपासून मशागतीपर्यंत कर्ज काढून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर हातचे जाण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेला पारावार उरलेला नाही. पिकांच्या निर्णायक अवस्थेत पावसाने पाठ फिरवल्याने कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या दमदार पावसाची नितांत गरज असताना पावसाने हुलकावनी दिली.

आरोग्य सुरक्षित राहावे

तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून पंचनाम्याच्या अटीशिवाय सरसकट प्रतिहेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी युवा शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांना आभाळाकडे पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उत्पादनात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता समितीने निवेदनातून व्यक्त केली आहे. कर्ज काढून उभे केलेले पीक संकटात बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT