Crackdown on encroachment in bus stand area
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात, बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांच्या मधोमध मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण अखेर नगरपरिषद प्रशासनाकडून हटविण्यात आले. सोमवारी (दि. १६) नगरपरिषद, पोलीस प्रशासन आणि संबंधित बांधकाम विभागाच्या संयुक्त सहभागातून ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जागेत चहाची हॉटेल, फळविक्रेत्यांच्या दुकानांसह दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ थाटण्यात आणि दुकाने त्यामुळे बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणामुळे प्रवाशांना तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. प्रशासनाने कारवाई करत बसस्थानकाच्या दोन्ही गेटमधील परिसरातील अतिक्रमण हटवून जागा मोकळी केली.
दरम्यान, परिसरात काही रिक्षा, हातगाड्या आणि लोडिंग माझा अद्याप दिसुन येत आहेत या कारवाईमुळे शिवाजी महाराज चौक आणि बसस्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. अतिक्रमण काढल्याने पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी नगर परिषदेच्या वतीने पुढाकार घेऊन कारवाई करायात्ची गरज आहे
नियमित कारवाईची गरज
बसस्थानक व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. चार-पाच दिवसात पुन्हा अतिक्रण होते. यामुळे नगर परिषदेच्या वतीने नियमित कारवाई करण्याची गरज आहे. किंवा दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.