Gas Prices : गॅस दरवाढीविरोधात नूतन वसाहत येथे काँग्रेसचे आंदोलन file photo
जालना

Gas Prices : गॅस दरवाढीविरोधात नूतन वसाहत येथे काँग्रेसचे आंदोलन

हातात गॅस सिलिंडर घेऊन कार्यकर्त्यांची निदर्शने

पुढारी वृत्तसेवा

Congress Protest at Nutan Vasahat Against Hike in Gas Prices

जालना, पुढारी वृत्तसेवा : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.१२) जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात गॅस सिलिंडर घेऊन केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ११५ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

निवेदनात महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असताना गॅस दरवाढीमुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे. तसेच व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्यास हॉटेल, खानावळ व खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष बदर चाऊस, सेवादल जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख, शकील भाई, वसीम भाई, रघुवीर गुडे, अमोल राजे भोसले, आसिफ पठाण, इखलास भाई, आदिल चाऊस यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोषणांनी परिसर दणाणला

आंदोलनादरम्यान 'गॅस दरवाढ कमी करा', 'महागाई रोखा', 'मोदी सरकार हाय हाय' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी काँग्रेसच्या वतीने जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गॅसच्या वाढलेल्या किमती तत्काळ कमी करण्याची मागणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT