महिला-बालकल्याणसह सहा समित्यांसाठी आजपासून अर्ज

समित्यांच्या सभापती निवडीसाठी १७ मार्चला विशेष सभा
jalna news
महिला-बालकल्याणसह सहा समित्यांसाठी आजपासून अर्जfile photo
Published on
Updated on

Applications for six committees including women and child welfare from today

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहर महानगरपालिका येथील स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच इतर विशेष समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडीसाठी १७मार्च २०२६ रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात नगर सचिव विभागाकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

jalna news
कष्टाच्या जीवनात सोशल मीडियाने दिला आनंदाचा क्षण

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ तसेच संबंधित नियमांनुसार या निवड प्रक्रिया पार पडणार असून स्थायी समितीसह स्वच्छता व आरोग्य, पाणी पुरवठा व जलनिस्सारण, शिक्षण व विधी तसेच बांधकाम समिती अशा एकूण सहा समित्यांच्या सभापती उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे.

मनपाच्या माहितीनुसार १७मार्च रोजी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत स्थायी समितीची विशेष बैठक होणार आहे. त्यानंतर अनुक्रमे महिला व बालकल्याण समिती, स्वच्छता व आरोग्य समिती, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती, शिक्षण व विधी समिती तसेच बांधकाम समितीच्या सभांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, या पदांसाठी नामनिर्देशन अर्ज १२ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत वितरित करण्यात येणार आहेत. १३ मार्च रोजी त्याच वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी १७ मार्च रोजी विशेष सभेदरम्यान करण्यात येणार आहे.

jalna news
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ

छाननीनंतर वैध उमेदवारांची नावे पीठासीन अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येतील. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना १५ मिनिटांच्या कालावधीत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे.

जालना शहर महानगरपालिका

या प्रक्रियेनंतर समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड निश्चित होणार असल्याने मनपाच्या राजकीय वर्तुळात या निवड प्रक्रियेची उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news