Jalna News : मिरची ४० तर १ किलो गहू दळायला ५ रुपये  File Photo
जालना

Jalna News: मिरचसाठी ४० तर १ किलो गहू दळायला ५ रुपये, दळणाचा भाव एवढा कसा वाढला?

दळणाचा भाव एवढा कसा वाढला ?, ग्रामीणमध्ये दर कमी

पुढारी वृत्तसेवा

Chilli costs 40 rupees and 1 kg of wheat costs 5 rupees to grind.

आन्वा, पुढारी वृत्तसेवा :

विजेचे वाढते दर, जागेचे भाडे यामुळे दळणाचे भाव वाढले आहेत., एक वर्षापूर्वी दळणाला दहा रुपये पायलीचा भाव होता. पण, वाढती महागाई, होणारा मेन्टेनन्स, विजेचा वाढता दर यात बसत नसलेला ताळमेळ त्यामुळे सध्या एक किलो मिरची, हळद, मसाला दळणासाठी ४० तर एक किलो गहू, ज्वारी, बाजरी, ५ रुपये मोजाते लागत आहेत.

वीजदरात वारंवार वाढ होत चालल्यामुळे साहजिकच धान्य दळणाच्या शुल्कात वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीं. वीजदरात सातत्याने वाढ होत असताना, पूर्वच्या दरात धान्य दळण करून देणे परतडत नसल्याचे दळणकेंद्र चालकांचे म्हणणे आहे. वीज महागली, गिरणीचे मेन्टेनन्स परवडेना पीठ गिरणीसाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. त्यात विजेच्या भावात वाढ होते. त्यात विजेच्या भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे गिरणीचे मेटेनन्स यात ताळमेळ जुळत नसल्याने गिरणीचा धंदा करताना चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. महिन्यातून एकवेळ जरी गिरणी दुरुस्त करायचे म्हणल्यास मोठा खर्च येतो.

गिरणीच्या दगडी जात्यांची टकाई करणाऱ्या कारागिरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गिरणी मालकालाच जात्याची टकाई करावी लागते. शिवाय व्यवस्थित टकाई झाली नाही, तर दळण चांगले येत नाही. ग्रामीण भागातही आता गिरणीसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने गिरणीचा व्यवसाय करणे शक्य नाही. सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतो.

घरखर्च वाढतोय

शहराच्या ठिकाणी गिरणीवर दळण दळण्यासाठी दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. पण, ग्रामीण भागात मात्र तेवढेच भाव आहेत. दर वाढत असल्याने घरखर्चही वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT