Jalna News : रक्षाबंधननिमित्त बहिणीकडे जात असताना भावाचा अपघाती मृत्यू  File Photo
जालना

Jalna News : रक्षाबंधननिमित्त बहिणीकडे जात असताना भावाचा अपघाती मृत्यू

बसच्या चाकारवाली आल्याने घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

Brother dies in accident while going to sister's house on Raksha Bandhan

बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : बदनापूर -येथील नगरपंचायत समोर जालना छत्रपती संभाजीनगर या मार्गावर एका ४७ वर्षीय व्यक्तीचा बस च्या मागच्या चाकाखाली येऊन मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) सकाळी ९:२० मिनिटाच्या सुमारास घडली आहे.

सदरील व्यक्तीचे नाव संजय सुदामराव चंदनपाट (४७ वर्ष) असून जडगांव ता जि. छञपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. संजय चंदनपाट हे रक्षाबंधन च्या निमित्ताने राखी बांधण्यासाठी जडगाव येथून सकाळीच एकटेच दुचाकीवरून (एम.एच. २० जीटी. २६७४) काळेगाव येथे जात असतानाच मध्येच बदनापूर येथे एस. टी बस (एम. एच १४ एम. एच १६७९ या क्रमांकाच्या बस च्या मागच्या चाकाखाली येऊन त्यांचा दुर्दैवाने मृत्यु झाला.

या अपघाताची माहिती बदनापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तीला पुढील तपासणी साठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मृत संजय चंदनपाट यांचा भाऊ अरूण सुदामराव चंदनपाट यांच्या फिर्यादीवरन बस चालकाविरुद्ध बदनापूर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेचा पुढील तपास सफौ बाबासाहेब जऱ्हाड हे करत आहे.

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी ट्रेलरच्या चाकाखाली येऊन एका १४ वर्षीय मुलीला देखील आपला जीव गमवावा लागला होता. छञपती संभाजीनगरहून आपल्या देऊळगाव राजा या गावी मुलगी आणि तिचे वडील दुचाकीवरुन जात असताना याच ठिकाणी दुचाकी वरुन पडुन ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली आल्याने मुलीचा जागीच मृतू झाला होता. ही घटना ताजीच असताना काल पुन्हा एकदा याच ठिकाणी अपघातात एका जणाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे परी-सरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT