Jalna Rain : रिमझिम पावसाने पिकांना जीवदान; शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मक्का, भुईमूग व भाजीपाला रिमझिम पावसावर आले आहे.
Jalna Rain
Jalna Rain : रिमझिम पावसाने पिकांना जीवदान; शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा File Photo
Published on
Updated on

Drizzles brought life to the crops; farmers await heavy rains

डोणगाव, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिप हंगामाती पिकांना जीवनदान मिळाले आहे. शेतकर्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

Jalna Rain
Malnutrition : आरोग्याचे वाळवंट ! ताटात योजना; पण पोटात भूक

खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मक्का, भुईमूग व भाजीपाला रिमझिम पावसावर आले आहे. मागील पंधरा दिवसात पावसाने उघड दिल्याने पिके सुकू लागली होती. परंतू मागील दोन दिवसापासून डोणगाव शिवारात रिमझिम पावसाला सुरूवात झाल्याने खरिप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे.

Jalna Rain
Kedareshwar : श्रावण-माघात उजळणारे केदारेश्वर : भक्तीची मेजवानी, निसर्ग, भक्ती आणि परंपरेचा संगम

शेतकऱ्यानी अंतर्गत मशागत करून रासायनिक खते, औषध फवारणी, वखरणी, खुरपणी आदी शेती कामे आटोक्यात आणली आहे. सध्या शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. अर्ध्यापही विहिरीना मुबलक पाणी आलेले शिवाय नदी-नाले कोरडेठाक पडलेले दिसून येत आहे. यावर्षी सुरूवातीपासून रिमझिम पाऊस असल्याने पीक बहरलेली दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news