भोकरदन ः अशा प्रकारे अज्ञात चोरट्याने शटर उचकटून चोरी केली. pudhari photo
जालना

Bhokardan shop theft : किराणा दुकान फोडून 25 हजारांची चोरी

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; चोरटे पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

भोकरदन ः येथील बस स्थानकासमोरील पिसे व्यापारी संकुलामध्ये असलेले असलेले विजय किराणा दुकानाचे शटर उचकाटून अज्ञात चोरट्यांनी दुचाकातील रोख पंचवीस हजार रुपये चोरून नेले आहे. ही घटना शुक्रवार, दि. 8 रोजी पहाटे तीन ते चार वाजे दरम्यान घडली.

विशेष म्हणजे दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दरम्यान, दुकानमालक दिलीप पिसे हे गुरुवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. शुक्रवारी पहाटे तीन ते चार वाजे दरम्यान दोन चोरटे व्यापारी संकुलामध्ये आले. चोरट्यांनी लोखंडी रॉड सदृश्य वस्तूने दुकानाचे शटर वाकून एकाने दुकानात प्रवेश केला.

दुकानाच्या काउंटर मध्ये ठेवलेली रोख रक्कम 5000 च्या बंडल व दहा व पाचची चिल्लर चे रोकडे असे 25 हजार रुपये त्यांनी चोरून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे. दुकान मालकाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT